नवी दिल्ली : मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेसचे नवीन अध्यक्ष बनले आहेत. त्यानंतर बसपप्रमुख मायावती यांनी ट्विट करुन काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. ‘काँग्रेस पक्षाला चांगल्या दिवसात दलितांचे संरक्षण आणि सन्मान आठवत नाही, पण वाईट दिवसात दलितांना बळीचा बकरा काँग्रेसकडून बनवले जाते’, अशा शब्दात मायावती यांनी टीका केली आहे. काँग्रेस वाईट राजकारण करत आहे, असेही त्या म्हणाल्या. Congress scapegoats Dalits, Dr. Mayawati always insulted Babasaheb Ambedkar’s tweets
काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे यांनी विजय संपादन केल्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असतानाच बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी मात्र काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसने नेहमीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला आहे. आता काँग्रेसचा वाईट काळ सुरू आहे. त्यामुळे या काळात दलितांना पुढे करण्याची काँग्रेसला आठवण झाली आहे. काँग्रेस दलितांना बळीचा बकरा बनवत आहेत, अशी टीका मायावती यांनी केली आहे.
आपले ‘द लेमन न्यूज’ न्यूज पोर्टल The lemon news नावाने ‘फेसबुक’, ‘टेलिग्राम’, ‘डेलिहंट’, ‘कू’ , ‘यूट्युब’वर आणि ‘ट्विटर’ वरही उपलब्ध (बातमीसाठी मोबाईल – 9404007610 व्हाटसअपवर संपर्क करा)
Visit us : https://thelemonnews.com
‘द लेमन न्यूज’च्या व्हाट्सॲप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी या दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/JdW1bsyn7wpBvxpavr.OnMA
2. अर्थात् कांग्रेस पार्टी को अपने अच्छे दिनों के लम्बे समय में अधिकांशतः गैर-दलितों को एवं वर्तमान की तरह सत्ता से बाहर बुरे दिनों में दलितों को आगे रखने की याद आती है। क्या यह छलावा व छद्म राजनीति नहीं? लोग पूछते हैं कि क्या यही है कांग्रेस का दलितों के प्रति वास्तविक प्रेम?
— Mayawati (@Mayawati) October 20, 2022
मायावती यांनी ट्विट करून ही टीका केली आहे. काँग्रेसने दलित आणि शोषितांचे नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि वंचित समाजाचा नेहमीच तिरस्कार केला. याला इतिहास साक्षी आहे. काँग्रेसला कधीच त्यांच्या चांगल्या दिवसात दलितांच्या सन्मानाची आठवण झाली नाही. मात्र, वाईट काळात दलितांना बळीचा बकरा बनवलं जात आहे, असं मायावती यांनी म्हटलं आहे.
आपल्या चांगल्या काळात काँग्रेसने नेहमीच गैर दलितांना पुढे केले. त्यांच्यासाठी सर्व काही केलं. त्यावेळी त्यांना कधीच दलितांची आठवण झाली नाही. मात्र, आता पडता काळ आल्याने त्यांना दलितांची आठवण आली आहे. हा छळ किंवा छद्म राजकारण नाही का? काँग्रेसचं दलितांवरील हेच वास्तव प्रेम आहे का? असा सवाल आता लोक करू लागले आहेत, असंही त्या म्हणाल्या.
मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडून आले आहेत. खर्गे हे कर्नाटकातून येतात. ते दलित समाजातील आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेस नेते शशी थरुर उभे होते. शशी थरुर यांना या निवडणुकीत 6 हजार 825 मते मिळाली. तर खर्गे यांना 7 हजार 897 मते मिळाली. थरुर यांच्या खात्यात 1072 मते आली. या निवडणुकीतील विजयानंतर काँग्रेसला तब्बल 24 वर्षानंतर गैर काँग्रेसी अध्यक्ष मिळाला आहे. त्यापूर्वी सीताराम केसरी हे गैर काँग्रेसी अध्यक्ष होते. काँग्रेसच्या 137 वर्षाच्या इतिहासात अध्यक्षपदासाठी केवळ सहावेळा निवडणूक झाली आहे.
मुळचे कर्नाटकातील असलेले मल्लिकार्जुन खर्गे यांचा राजकीय प्रवास अगदी कार्यकर्त्यापासून सुरू झाला. ते कर्नाटक विधानसभेत आमदार आणि राज्य सरकारमध्ये मंत्री देखील राहिले आहेत. खर्गे 9 वेळा आमदार आणि दोन वेळा खासदार होते. खर्गे यांनी केंद्र सरकारमध्ये देखील मंत्रीपद भूषवलं आहे. दलित समाजातून येणारे मल्लिकार्जुन खर्गे यांचं नेतृत्त्व पक्षाला पुनरुज्जीवन करण्यात यशस्वी होईल, अशी काँग्रेसला आशा आहे.