नवी दिल्ली : टी-20 वर्ल्डकपमध्ये उद्या (23 ऑक्टोबर) भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. तर आशिया कपसाठी भारतीय संघ पाकिस्तानात पाठवायचा की नाही यावर चर्चा अशातच असदुद्दीन ओवेसी यांनी मोठी प्रतिक्रिया दिली. तुम्ही सुरू आहे. जय शाह आशियाई क्रिकेट परिषदचे प्रमुख आहेत. त्यांना डिवचण्याचा प्रयत्न ओवेसी यांनी केला. Don’t play match against Pakistan tomorrow – Asaduddin Owaisi Melbourne Jai Shah
मेलबर्नच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तानचे संघ आमने-सामने येणार आहेत. असं असतानाच दुसरीकडे २०२३ च्या आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानला पाठवायचा की नाही यावर वाद सुरु आहेत. गेल्या काही दिवसापासून भारत पाकिस्तान सामन्यावरुन वादंग सुरू आहेत. भारतीय संघ पाकिस्तानचा दौरा करणार नसल्यामुळे आशिया चषक तटस्थ ठिकाणी खेळवला जाईल, असे बीसीसीआयच्या सचिवांनी म्हटले होते. यावर आता खासदार ओवेसी यांनी प्रतिक्रिया दिली.
टी-२० विश्वचषकाचा सामना कोण जिंकणार, भारत की पाकिस्तान?, असा प्रश्न ओवेसी यांनी पत्रकारांनी केला. यावर ओवेसी यांनी, ‘मला माहित नाही की सामना कोण जिंकेल, पण भारत जिंकावा आणि शमी आणि सिराजसारखी आमची मुलं पाकिस्तानला चिरडून टाकावीत अशी माझी इच्छा आहे, असंही ओवेसी म्हणाले. यावेळी ओवेसी यांनी मुस्लिम खेळाडूंच्या ट्रोलिंगचा मुद्दाही उपस्थित केला. या उलट पराभव झाला तर ते त्यासाठी दोष कोणाला द्यावा याचा शोध घेतली. तुमची नेमकी अडचण काय आहे? हा क्रिकेटचा खेळ आहे याच विजय आणि पराभव होत असतो,” असं ओवेसींनी मुस्लीम खेळाडूंना लक्ष्य करण्याच्या मुद्द्यावरुन टीका करताना म्हटलं आहे. तेलंगणमधील विक्राबाद येथे ते बोलत होते.
उद्या रविवारी (ता. 23) पाकविरुद्ध सामना का खेळत आहात ? नव्हता खेळायला पाहिजे ना. आम्ही पाकमध्ये जाणार नाही पण ऑस्ट्रेलियामध्ये त्याच्याविरोधात खेळू. हे कोणत्या प्रकारचं प्रेम आहे?, असं ते म्हणाले. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-20 विश्वचषक सामन्याबाबत बीसीसीआयला टोला लगावला आहे.
“भारतीय संघ ऑस्ट्रेलियात पाकिस्तानसोबत क्रिकेट सामने का खेळत आहे? त्यांना तिथेही खेळायचेही नव्हते. भारतापेक्षा पाकिस्तानसोबतचा क्रिकेट सामना महत्त्वाचा आहे का? आशिया चषक खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणार नाही, पण त्यांच्यासोबत ऑस्ट्रेलियात खेळणार आहे. व्वा काय प्रेम आहे, असा टोला ओवेसी यांनी लगावला. तुम्ही जर पाकिस्तान विरुद्ध खेळला नाही तर काय होईल? टेलिव्हिजनचे २००० कोटींचे नुकसान होईल, पण भारतापेक्षा जास्त फरक पडतो का?, असा सवालही त्यांनी केला आहे.
● T20 World Cup –
उद्या भारत पाकिस्तान मॅच
– भारताचं वेळापत्रक टी-20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ पाकिस्तानशी पहिला मुकाबला
खेळणार आहे. या स्पर्धेतील भारतीय संघाचं असं आहे वेळापत्रक
-भारत विरुद्ध पाकिस्तान – 23 ऑक्टोबर
-भारत विरुद्ध नेदरलँड – 27 ऑक्टोबर
– भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – 30 ऑक्टोबर
– भारत विरुद्ध बांग्लादेश- 2 नोव्हेंबर -भारत विरुद्ध झिम्बाब्वे- 6 नोव्हेंबर
आपले ‘द लेमन न्यूज’ न्यूज पोर्टल The lemon news नावाने ‘फेसबुक’, ‘टेलिग्राम’, ‘डेलिहंट’, ‘कू’ , ‘यूट्युब’वर आणि ‘ट्विटर’ वरही उपलब्ध (बातमीसाठी मोबाईल – 9404007610 व्हाटसअपवर संपर्क करा)
Visit us : https://thelemonnews.com
‘द लेमन न्यूज’च्या व्हाट्सॲप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी या दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/JdW1bsyn7wpBvxpavr.OnMA
》 अभिनेता रितेश – जेनेलिया यांना भाजपने केले लक्ष्य; एमआयडीसी प्रशासन येणार अडचणीत
मुंबई / लातूर : अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांच्यावर भाजपने गंभीर आरोप केले आहेत. रितेश आणि जेनेलिया यांच्या कंपनीला लातूर MIDC ने 15 दिवसात भूखंड उपलब्ध करून कसा दिला ? असा सवाल भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांनी केला आहे. तसेच MIDC मध्ये भूखंड मिळवण्यासाठी अनेक लोक वेटिंगलिस्टवर असताना त्यांनाच भूखंड कसा मिळाला, असंही मगे म्हणाले.
बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांचा एक कारखाना सुरु होण्याआधीच चर्चेत आला आहे. जेनेलिया आणि रितेश देशमुख यांना त्यांच्या नव्या कारखान्यासाठी 15 दिवसांत भूखंड उपलब्ध झाल्याचा आरोप करत भाजपने यावर आक्षेप घेतला आहे.
लातूरमधील 16 उद्योजकांना डावलून देशमुखांना अवघ्या दहा दिवसांत भुखंड मंजूर करण्यात आल्याचा आरोप भाजपने रितेश आणि जेनिलियावर केला आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने त्यांना 116 कोटीं रकमेचा पुरवठा काही दिवसातच कसा काय केला? असा प्रश्नसुद्धा आता उपस्थित होत आहे. रितेश आणि जेनेलिया यांच्या कंपनीला केवळ एका महिन्यात 120 कोटींचे कर्ज कसे दिले गेले.
या प्रश्नावरून आता चर्चा सुरु झाल्या आहेत. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने व्हायरल केलेल्या बातमीमध्ये रितेश आणि जेनेलिया यांच्यावर वेगवेगळे आरोप करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान हाती आलेल्या माहितीनुसार कमी कालावधीत म्हणजेच केवळ एका महिन्याच्या आत रितेश आणि जेनिलिया यांना कर्ज मिळाले. त्या बँकेने आतापर्यत किती जणांना कर्ज दिले? त्या बँकेने देशमुख यांच्या कार्यकर्त्यांना कर्ज दिले आहे, असाही आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांची चौकशी वरिष्ठ पातळीकडून करण्यात यावी, असा जाब भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून विचारण्यात आला आहे.
दरम्यान या सगळ्या प्रकरणी लातूर देश ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेडचे आस्थापना व्यवस्थापक दिनेश केसरी ‘संबंधित वृत्त हे चुकीच्या माहितीच्या आधारे आहे असे म्हणत खुलासाही पाठवला आहे.
● एमआयडीसी प्रशासन येणार अडचणीत
भाजपने केलेल्या आरोपांमुळे लातूर एमएमआयडीसी प्रशासन अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी में.देश ऍग्रो प्रा.लि. नावाची एक कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीच्या माध्यमातून देशमुख यांना कृषी प्रक्रियेचा कारखाना सुरु करायचा आहे.
हा कारखाना सुरु होण्याआधीच तो वादात सापडला आहे. भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांनी यावर आक्षेप घेतला आहे. रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांच्या में.देश ऍग्रो प्रा.लि. कंपनीला लातूर एमआयडीसीने 15 दिवसात भूखंड उपलब्ध करून कसा दिला? असा सवालच मगे यांनी उपस्थित केला आहे.
एमआयडीसीमध्ये भूखंड मिळवण्यासाठी अनेक लोक वेटिंगलिस्टवर आहेत. आधीपासूनच यांनी अर्ज दिले आहेत. असे असताना रितेश देशमुख यांनाच तातडीने भूखंड उपलब्ध करुन दिल्याचा गुरुनाथ मगे यांनी केला आहे. जाहीर पत्रकार परिषद घेत मगे यांनी हे आरोप केले आहेत.
एमआयडीसीमध्ये रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांना जी जमिन देण्यात आली ती कोणत्या निकषांच्या आधारे देण्यात आली. असा प्रश्न आता विचारण्यात येतो आहे. दरम्यान या सगळ्यावर रितेश देशमुख आणि जेनिलिया देशमुख काय प्रतिक्रिया देणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
From the lemon news
Today is the first day of Diwali is Vasubaras. As our Indian culture is agrarian, cows and calves are worshiped in the evening. This pooja is also performed for the children to get good health and wealth. Let the colours of this holy night decorate your life with peace, prosperity and success. The lemon news team ?s wish you unforgettable Diwali this year.
Team the lemon news