● प्रवासी निघाला मुंबईतला बिझनेसमन
नवी दिल्ली : अमेरिकेतील JFK येथून नवी दिल्लीत येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला. बिझनेस क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या अंगावर तिच्या सहप्रवाशाने लघुशंका केल्याची घटना 26 नोव्हेंबर 2022 रोजी घडली होती, अशी माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणी एअर इंडियाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. Mumbai businessman suspected on the body of the woman in the plane, the police are searching for that passenger
दरम्यान महिलेवर लघुशंका करणारा प्रवासी नशेत होता, त्यामुळे हा प्रकार घडला आहे. एअर इंडियाच्या अमेरिकेतून दिल्लीत येणाऱ्या विमानात एका मद्यधुंद प्रवाशाने शेजारी बसलेल्या सहप्रवासी महिलेवर लघुशंका केली होती. या प्रकरणी दिल्ली पोलीस त्या प्रवाशाचा शोध घेत आहेत. मुंबईतील मीरा रोड परिसरात तो व्यक्ती राहतो, पण सध्या तो इतर राज्यात आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. दिल्ली पोलीस त्याचा शोध घेत असून त्याला लवकरच अटक करण्यात येणार आहे. त्याच्यावर पोलिसांनी FIR दाखल केले आहे.
न्यूयॉर्क ते नवी दिल्ली फ्लाइटमध्ये मद्यधुंद अवस्थेत महिला प्रवाशावर लघवी करणारी व्यक्ती ही मुंबईतली बिझनेसमन आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, त्या व्यक्तीला लवकरात लवकर अटक केली जाईल, असं दिल्ली पोलिसांनी सांगितलं आहे. “हा आरोपी मुंबईचा रहिवासी आहे; पण सध्या तो इतर राज्यात आहे.
पोलिसांचं पथक तिथे पोहोचलं आहे,” अशी माहिती दिल्ली पोलिसांनी वृत्तसंस्थेला दिली आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. एएनआयने दिल्ली पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी प्रवासी मुंबईतल्या मीरा रोड भागातला रहिवासी आहे. तो सध्या मुंबईत नाही.
आपले ‘द लेमन न्यूज’ न्यूज पोर्टल The lemon news नावाने ‘फेसबुक’, ‘टेलिग्राम’, ‘डेलिहंट’, ‘कू’ , ‘यूट्युब’वर आणि ‘ट्विटर’ वरही उपलब्ध (बातमीसाठी मोबाईल – 9404007610 व्हाटसअपवर संपर्क करा)
Visit us : https://thelemonnews.com
‘द लेमन न्यूज’च्या व्हाट्सॲप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी या दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/JdW1bsyn7wpBvxpavr.OnMA
घटनेच्या वेळी फ्लाइटमध्ये उपस्थित असलेल्या सर्व केबिन क्रू मेंबर्सना दिल्ली पोलीस नोटीस देऊ शकतात आणि त्यांना स्टेटमेंटसाठी बोलावू शकतात. याशिवाय, पोलिसांनी पीडित महिलेच्या आजूबाजूला बसलेल्या प्रवाशांचीही माहिती मागवली आहे. पीडितेने एअर इंडियाकडे केलेल्या तक्रारीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी बुधवारी (4 जानेवारी) गुन्हेगाराविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. आरोपीला पकडण्यासाठी अनेक पथकं तयार केली गेली आहेत.
क्रू मेंबर्सनी पीडित महिला प्रवाशाला नवीन कपड्यांचा सेट देऊन क्रू सीटवर बसवण्यास जागा दिली होती. विमान भारतात उतरल्यानंतर कोणतीही तत्काळ कारवाई करण्यात आली नाही. महिला प्रवाशाच्या लेखी तक्रारीनंतरच, एअरलाइनने अंतर्गत चौकशी समिती स्थापन केली. या समितीनं आरोपी प्रवाशाला 30 दिवसांसाठी उड्डाण करण्यास बंदी घातली आहे.
हे प्रकरण पुढच्या कारवाईसाठी डीजीसीएकडे पाठवण्यात आलं आहे. एअर इंडियाच्या सूत्रांनी बुधवारी (4 जानेवारी) असा दावा केला की, पीडित प्रवाशाला तक्रार नोंदवायची नव्हती. आरोपी प्रवाशाने माफी मागितल्यानंतर आणि आर्थिक भरपाई दिल्याने फ्लाइटमध्येच प्रकरण मिटलं, अशी बातमी पीटीआयने दिली आहे. एअर इंडियाने असाही दावा केला आहे, की फ्लाइटमधल्या क्रूने आपल्या कर्तव्यात कोणतीही हलगर्जी केलेली नाही. . त्यांनी पीडित प्रवाशाला साथ दिली आणि तिला क्रूसाठी राखीव असलेल्या पर्यायी बिझनेस क्लास सीटवर बसवलं.