□ 20 लाख युझर्स एकट्या भारतातील युझर्स, कोरोना महामारीत वाढले युझर्स
वृत्तसंस्था : पाश्चात्य देशांप्रमाणेच भारतामध्येही आता विवाहबाह्य डेटिंग ॲपचे फॅड आले आहे. ग्लीडन या विवाहबाह्य डेटिंग ॲपच्या वापरात प्रचंड वाढ दिसून येत आहे. गिल्डेन ॲपच्या भारतातील युझर्सची संख्या तब्बल २० लाखांवर गेली आहे. महत्त्वाचे म्हणजे कोरोना विषाणू महामारीमध्ये विवाहबाह्य डेटिंग ॲप्सच्या वापराकडे लोकांचा कल वाढला आहे. Out-of-marriage ‘dating app’ fad increased in India, users increased during Corona period
फ्रान्सच्या विवाहबाह्य डेटिंग ॲप ग्लीडनने नुकतेच जाहीर केले की, त्यांचे जगभरात १ कोटी वापरकर्ते झाले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यापैकी २० लाख युझर्स हे एकट्या भारतातील आहेत. सप्टेंबर २०२२ पासून भारतीय युझर्सच्या संख्येमध्ये ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ग्लिडेन हे विवाहित लोकांसाठी जगातील पहिले विवाहबाह्य संबंध डेटिंग ॲप आहे. हे ॲप २००९ मध्ये फ्रान्समध्ये लाँच करण्यात आले आणि २०१७ मध्ये भारतात आले.
ग्लिडनचे भारताचे कंट्री मॅनेजर सिबिल शिडेल यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, भारत असा देश आहे जिथे ॲपवरील वापरकर्त्यांची दिवसेंदिवस संख्या वाढत आहे. २०२२ मध्ये १८ टक्क्यांहून अधिक नवीन वापरकर्ते हे ॲप वापरू लागले आहेत. डिसेंबर २०२१ मध्ये ही संख्या १५ लाखांच्या आसपास होती, जी आता २० दशलक्षांपेक्षा जास्त झाली आहे.
आपले ‘द लेमन न्यूज’ न्यूज पोर्टल The lemon news नावाने ‘फेसबुक’, ‘टेलिग्राम’, ‘डेलिहंट’, ‘कू’ , ‘यूट्युब’वर आणि ‘ट्विटर’ वरही उपलब्ध (बातमीसाठी मोबाईल – 9404007610 व्हाटसअपवर संपर्क करा)
Visit us : https://thelemonnews.com
‘द लेमन न्यूज’च्या व्हाट्सॲप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी या दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/JdW1bsyn7wpBvxpavr.OnMA
हे ॲप विशेषतः विवाहित लोकांसाठी डिझाइन केले गेले आहे. ग्लीडनवरील भारतीय वापरकर्त्यांची वाढ हे प्रतिबिंबित करते की, देशातील एक पत्नीत्वाच्या पारंपरिक संकल्पना हळूहळू बदलत आहेत. अनेक जोडपी एकमेकांच्या सहमतीनेही हे ॲप वापरत आहेत. कंपनीने असेही म्हटले आहे की, ग्लीडनवरील बहुतेक भारतीय वापरकर्ते हे हायप्रोफाइल आहेत. यातील पुरुष आणि स्त्रिया दोघेही अभियंते, उद्योजक, सल्लागार, व्यवस्थापक, अधिकारी आणि डॉक्टर असे व्यावसायिक आहेत.
भारतामधील ग्लीडन युझर्समध्ये मोठ्या संख्येने गृहिणींचाही समावेश आहे. वयोमानानुसार, अॅपवरील पुरुष बहुतेक ३० वर्षांवरील आहेत, तर महिला २६ वर्षांच्या वरील वयाच्या आहेत. कंपनीने सांगितले की, हे ॲप महिलांसाठी अतिरिक्त सुरक्षित केले गेले आहे आणि अशा प्रकारे २०२३ मध्ये ६० टक्के पुरुष, तर ४० टक्के महिला युझर्स असतील. नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार ग्लीडनचे सर्वाधिक युझर्स है मुंबई, कोलकाता, दिल्ली, पुणे, हैदराबाद, चेन्नई, गुडगाव, अहमदाबाद, जयपूर, चंदीगड, लखनौ, नोएडा, नागपूर, सुरत आणि भुवनेश्वर या शहरांतील होते.