□ पठाण चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर बोर्डाची स्थापना
□ चित्रपट, वेबसिरीजवर ठेवणार लक्ष
नवी दिल्ली : चित्रपटांमध्ये अमूक दृश्यावरून विशिष्ट धर्माच्या भावना दुखावल्याची प्रकरणे वाढत आहेत. आता यावरूनच उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये धर्म सेन्सॉर बोर्डाची स्थापना करण्यात आली आहे. ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती धर्म सेन्सॉर बोर्डाची स्थापना केली आहे. Formation of Religion Censor Board after ‘Pathan’ Controversy; A web series that will insult Hindu gods
चित्रपट, वेबसिरीज यावर लक्ष ठेवण्यासाठी या बोर्डाची स्थापना करण्यात आली आहे. हिंदू देवतांचा अपमान सहन करणार नसल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे. या धर्म सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती हे असतील.
पठाण चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर हा बोर्ड स्थापन करण्यात आला आहे. हिंदू देवतांचा अपमान सहन करणार नसल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे. चित्रपट व वेबसिरीजवर आता धर्म सेन्सॉर बोर्डाचा वॉच असेल. हिंदू देवी – देवतांचा अपमान रोखण्यासाठी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे माघ मेळाव्याला उपस्थित असणाऱ्या संतांनी धर्म सेन्सॉर बोर्डाची स्थापना केली आहे. चित्रपट व वेबसिरीजमध्ये देवी – देवतांचा अपमान होऊ नये. यावर आता धर्म सेन्सॉर बोर्ड लक्ष ठेवणार आहे.
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती या धर्म सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष असतील. या सेन्सॉर बोर्डात १० सदस्यांचा समावेश असेल. बोर्डाकडे आलेल्या तक्रारी संबंधित चित्रपट आणि वेबसिरजीची हे बोर्ड पाहणी करेल. या चित्रपटात हिंदू देवतांचा अपमान झाला असल्यास तो चित्रपट, त्याची निर्मिती आणि प्रदर्शन तातडीने थांबवण्यात येईल. पठाण चित्रपटातील दिपीकाच्या भगव्या बिकनी वरुन सुरू असलेला वाद ताजा असताना हा बोर्ड स्थापन करण्यात आला आहे.
आपले ‘द लेमन न्यूज’ न्यूज पोर्टल The lemon news नावाने ‘फेसबुक’, ‘टेलिग्राम’, ‘डेलिहंट’, ‘कू’ , ‘यूट्युब’वर आणि ‘ट्विटर’ वरही उपलब्ध (बातमीसाठी मोबाईल – 9404007610 व्हाटसअपवर संपर्क करा)
Visit us : https://thelemonnews.com
‘द लेमन न्यूज’च्या व्हाट्सॲप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी या दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/JdW1bsyn7wpBvxpavr.OnMA
□ धर्म सेन्सॉर बोर्ड स्वतंत्र प्रमाणपत्र देणार
या बोर्डाची मार्गदर्शक तत्त्वेही आता जाहीर करण्यात आली आहे. सर्व चित्रपटांचे पहिले शो पाहिल्यानंतर धर्म सेन्सॉर बोर्ड स्वतंत्र प्रमाणपत्र देईल. सर्व प्रथम २५ जानेवारी रोजी बॉलिवूड स्टार्स शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा वादग्रस्त चित्रपट पठाण धर्म सेन्सॉर बोर्डाकडून पाहीला जाणार आहे. तसेच हे बोर्ड इतर चित्रपटांकडेही लक्ष देणार आहे.
मार्गदर्शक तत्त्वे लवकरच निर्माता, दिग्दर्शक यांना कळवली जाणार आहेत. त्यानंतर बॉलीवूड चित्रपट, मालिका आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कंटेंटचे परीक्षण केले जाईल. बोर्डाचे सदस्य प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाचा पहिला शो पाहतील. आक्षेपार्ह मजकूर आढळल्यास, धर्म सेन्सॉर बोर्ड हा उतारे काढून टाकण्याची मागणी करेल. तसेच निर्माते, दिग्दर्शकांनी या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नाही, तर धर्म सेन्सॉर बोर्डाचे सदस्य चित्रपटावर कायदेशीर आणि सामाजिक कारवाई केली जाईल, असे स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी सांगितले.