अमरावती : धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात छत्रपती सेनेने अमरावती येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन केले आहे. ‘धीरेंद्र शास्त्री हे गरीब जनतेची लूट करत आहेत. त्यांनी आमच्या 21 कार्यकर्त्यांचा ATM पिन अचूक सांगितला तर 21 लाख रुपयांचे बक्षीस त्यांना देऊ’, असे छत्रपती सेनेचे अध्यक्ष नरेंद्र कठाने यांनी म्हटले आहे. धीरेंद्र शास्त्री यांना छत्रपती सेनेने 21 लाख रुपयांचे खुले आव्हान दिले आहे. 21 lakhs if told ATM PIN; Chhatrapati Sena’s open challenge to Dhirendra Shastri
देशभरामध्ये धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराजांचे नाव चांगलेच चर्चेत आले आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी धीरेंद्र महाराज लोकांची दिशाभूल आणि फसवणूक करत असल्याचा आरोप केला.
धीरेंद्र महाराजांनी ते सांगत असलेले दावे नागपूरला येऊन सिद्ध करावे आणि ३० लाख रुपयांचे बक्षीस घ्यावे, असं आव्हान श्याम मानवांनी दिलं. यानंतर आता अमरावतीच्या छत्रपती सेनेने धीरेंद्र महाराजांना २१ लाख रुपयांचे खुले आव्हान दिले आहे. छत्रपती सेनेच्या कार्यकर्त्यांनी अमरावतीत धीरेंद्र महाराजांविरोधात आंदोलन केले.
यावेळी त्यांनी धीरेंद्र महाराज लोकांची फसवणूक करत असल्याचा आरोप केला. तसेच धीरेंद्र महाराजांनी छत्रपती सेनेच्या आमच्या २१ कार्यकर्त्यांच्या एटीएमचे पासवर्ड सांगावे. ते बरोबर सांगू शकले, तर त्यांना २१ लाख रुपयांचे बक्षीस देऊ अशी घोषणा छत्रपती सेनेचे अध्यक्ष नरेंद्र कठाणे यांनी केली. छत्रपती सेनेने अमरावतीमध्ये धीरेंद्र महाराजांच्या अटकेच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एकदिवसीय धरणे आंदोलनही केले.
आपले ‘द लेमन न्यूज’ न्यूज पोर्टल The lemon news नावाने ‘फेसबुक’, ‘टेलिग्राम’, ‘डेलिहंट’, ‘कू’ , ‘यूट्युब’वर आणि ‘ट्विटर’ वरही उपलब्ध (बातमीसाठी मोबाईल – 9404007610 व्हाटसअपवर संपर्क करा)
Visit us : https://thelemonnews.com
‘द लेमन न्यूज’च्या व्हाट्सॲप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी या दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/JdW1bsyn7wpBvxpavr.OnMA
नरेंद्र कठाने म्हणाले, “धीरेंद्र शास्त्री महाराज, देवकीनंदन ठाकूर आणि प्रदीप मिश्रा यांच्याविरोधात आज आम्ही एक दिवसाचा बैठा सत्याग्रह करत आहोत. हे तिघेही गरीब जनतेचा पैसा लुटून ऐशोआरामात जगत आहेत. विदेशात फिरत आहेत. दुसरीकडे भोळीभाबडी जनता अजूनही गरिबीत रस्त्यावर फिरत आहे.
दरम्यान, धीरेंद्र शास्त्री लखनऊमध्ये येऊन मुख्यमंत्री योगी यांची भेट घेणार आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत ही भेट घडून येऊ शकते. धीरेंद्र शास्त्री यांनी मुख्यमंत्री योगींना भेटण्यासाठी वेळ मागितली आहे. सीएम योगींना भेटण्याची वेळ शनिवार किंवा रविवारला मिळू शकते, अशी माहिती आहे. पंडित धीरेंद्र शास्त्री जेव्हा मुख्यमंत्री योगींना भेटतील तेव्हा त्यांच्यासोबत निर्मोही आखाड्याचे महामंडलेश्वर महंत संतोष दास उर्फ सटुआ बाबाही असतील. धीरेंद्र शास्त्री यांना मुख्यमंत्री योगी यांची अनौपचारिक भेट घ्यायची आहे.
18 फेब्रुवारीला महाशिवरात्रीला बागेश्वर धाम येथे होणाऱ्या सामूहिक विवाह कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री योगींना निमंत्रित करतील आणि सामूहिक विवाह कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सीएम योगींना औपचारिक विनंतीही करतील. बागेश्वर बाबा यांनी मुख्यमंत्री योगींना भेटण्यासाठी शुक्रवार 27 जानेवारीला वेळ मागितली होती. सीएम योगी आदित्यनाथ 27 जानेवारीला दौऱ्यावर असल्यामुळे आज भेट होऊ शकली नाही.
25 जानेवारी रोजी झालेल्या संत संमेलनात संतांनी एकमताने बागेश्वर बाबांना पाठिंबा दिला.भारताला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करण्याच्या त्यांच्या चर्चेला बहुतांश संतांनी पाठिंबा दिला. त्यानंतर धीरेंद्र शास्त्री माघ मेळ्यात येतील आणि या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतील. धीरेंद्र शास्त्री हे 2 फेब्रुवारीला प्रयागराजच्या मेजा भागातील शीतला महोत्सवात सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम प्रयागराजच्या मेजा भागात होणार आहे. या कार्यक्रमात बागेश्वर बाबा जवळपास ३ ते ४ तास राहणार आहेत. मात्र, आता सीएम योगी आदित्यनाथ आणि वीरेंद्र शास्त्री यांच्यात काय संवाद होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.