● खासदार सुप्रिया सुळे संतापल्या तर देहू संस्थानने केली कानउघडणी
मुंबई : चमत्कार आणि मनातलं ओळखून दाखवणार, या दाव्यांमुळे आधीच वादात अडकलेले बागेश्वर बाबा आता मोठ्या वादात अडकले आहेत. ‘तुकाराम महाराज यांना त्यांची बायको दररोज मारायची. म्हणून त्यांनी देवाचा धावा केला होता’, अशी मुक्ताफळे बागेश्वर महाराज यांनी उधळली आहेत. त्यांच्या या विधानाचा सर्वच स्तरातून तीव्र निषेध होत आहे. The Controversial Bageshwar Baba Spouts About Sant Tukaram Maharaj, Dehu Sansthan ear opening Supriya Sule
आधी आपल्या चमत्काराच्या दाव्यामुळे अडचणीत आलेले बागेश्वर बाबा आता नव्या वादात अडकले आहेत. संत तुकाराम महाराज यांना त्यांची पत्नी रोज मारहाण करायची. म्हणूनच त्यांनी देवाचा धावा घेतला, अशी मुक्ताफळे बागेश्वर बाबा यांनी उधळली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. भाजपच्या अध्यात्मिक आघाडीसह राष्ट्रवादी काँग्रेसनेही बागेश्वर बाबांच्या विधानाचा निषेध नोंदवला आहे.
धीरेंद्र कृष्ण शास्त्रींनी संत तुकारामांबद्दल केलेल्या विधानावर सुप्रिया सुळे संतापल्या आहेत. जे लोक असे बोलतात ते अर्थातच चुकीचे आहे. मी अध्यात्म करते म्हणजे माझ्या घरात वाईट आहे असे नाही. हे भारतीय संस्कार आहेत. हे संस्कार आपल्या मुलांवर करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. तुकाराम महाराजांचा अंधश्रद्धापमान केला जात असेल तर एक समाज म्हणून आपण त्याचा निषेध केला पाहिजे, असे त्यांनी म्हटले.
तर बागेश्वर बाबांनी संत तुकाराम महाराजांबद्दल केलेल्या या विधानानंतर देहू संस्थाननेही अतिशय तीव्र शब्दात त्यांची कानउघडणी केली आहे. “तुकाराम महाराज यांनी अन्नप्राशन केल्याशिवाय त्यांच्या पत्नी जेवण करत नव्हत्या त्यामुळे चुकीचा इतिहास पसरवू नका, तुम्हाला जर खरी माहिती घ्यायची असेल तर देहू मध्ये या आणि तुकाराम महाराजांची माहिती घ्या,” अशा शब्दात देहू संस्थानकडून बागेश्वर बाबांना सुनावण्यात आलं आहे.
तर राष्ट्रवादीचे नेते आमदार, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काय म्हटले याचा व्हिडिओ ट्वीट करत कुठे दिसेल तिथं बडवा असे म्हटले आहे.
या असल्या नकलाकार बाबांनी आमच्या महापुरुषांच्या बाबतीत तोडलेले अकलेचे तारे बघितल्यावर तुकोबारायांच्या शब्दातच सांगायचं म्हटल तर,
"तुका म्हणे ऐशा नरा
मोजून माराव्या पैजारा"ही उक्ती योग्यच वाटते.
अन व्यावहारिक भाषेत बोलायचं म्हटल तर,
"जोड्याने मारल पाहिजे याला..!"यावरच समाधान होत. pic.twitter.com/h2hm2DtBJc— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 29, 2023
काही दिवसांपूर्वी अंनिसने दिलेल्या चॅलेंजमुळे महाराष्ट्रातही ते प्रसिद्धीझोतात आले होते. आता संत तुकाराम महाराज यांच्याविषयी अपमानास्पद विधान केलंय. त्यामुळे चमत्कारामुळे चर्चेत आलेल्या बागेश्वर बाबांवर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे.
आपले ‘द लेमन न्यूज’ न्यूज पोर्टल The lemon news नावाने ‘फेसबुक’, ‘टेलिग्राम’, ‘डेलिहंट’, ‘कू’ , ‘यूट्युब’वर आणि ‘ट्विटर’ वरही उपलब्ध (बातमीसाठी मोबाईल – 9404007610 व्हाटसअपवर संपर्क करा)
Visit us : https://thelemonnews.com
‘द लेमन न्यूज’च्या व्हाट्सॲप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी या दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/JdW1bsyn7wpBvxpavr.OnMA
संत तुकाराम महाराज यांना त्यांची पत्नी रोज मारहाण करायची. म्हणूनच त्यांनी देवाचा धावा घेतला, अशी मुक्ताफळं बागेश्वर बाबा यांनी उधळली. महाराष्ट्राचे एक महात्मा ज्यांची पत्नी त्यांना रोज मारत होती. त्यावेळी त्यांना विचारण्यात आलं, बायकोकडून मार खाता, तुम्हाला लाज वाटत नाही का?, त्यावेळी महाराज म्हणाले. ही तर देवाची कृपा ती मला रोज मारते. जर मला प्रेम करणारे बायको मिळाली असती तर मी देवाचा धावा केला नसता, असं देखील बागेश्वर म्हणाले आहेत. त्यांनी त्यांच्या प्रवचनामध्ये हे विधान केलंय.
भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनीही या प्रकरणी माफीची मागणी केली आहे. पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी संत तुकाराम यांच्याविषयी बोलताना अत्यंत चुकीचा संदर्भ दिला. त्यांच्या विधानाने केवळ वारकरी संप्रदायाचाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचा अवमान झाला. त्यामुळे बागेश्वर बाबांनी माफी मागावी, असे आचार्य तुषार भोसले यांनी म्हटले आहे.