सोलापूर : कोरोना महामारीमध्ये दोन वर्षे शाळा बंद होत्या. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणाद्वारे मुलांना पाठ शिकविण्यात आले. त्यामुळे मुलांनी हातात मोबाईल घेतला, तर पालकही काही बोलताना दिसत नाहीत. Effects of Online Learning on Students’ Eyes; 6500 people in Solapur District Visually Impaired Blindness Prevention Committee मात्र, त्या ऑनलाइनचा मुलांच्या डोळ्यांवर परिणाम, होत आहे. त्याची प्रचिती सोलापुरातील मुलांच्या डोळ्यांची तपासणी केल्यावर लक्षात आली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील एकूण साडेसहा हजार मुलांना चष्मे लागले असून, त्यापैकी ३ हजार ९२१ मुलांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले आहे.
सोलापूर जिल्हा अंधत्व निवारण समिती व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ‘चला मुलांनो उजेडाकडे हा उपक्रम राबविण्यात आला. तो उपक्रम आजतागायत सुरू आहे. या मोहिमेत ६ ते १८ वयोगटातील मुलांची दृष्टिदोष तपासणी आजतागायत सुरू केली. जिल्ह्यातील ७७ प्राथमिक आरोग्य केंद्र, १४ ग्रामीण रुग्णालये, ०३ उपजिल्हा रुग्णालये स्तरावर मुलांची दृष्टिदोष तपासणी करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील ९ लाख ६३ हजार ८२९ मुलांमधील ज्या मुलांना दृष्टी दोषाची लक्षणे आहेत, त्यांची दृष्टिदोष तपासणी ‘चला मुलांनो ‘उजेडाकडे’ या मोहिमेंतर्गत करण्यात येत आहे. डिसेंबर २०२२ अखेरपर्यंत ३ लाख ४७ हजार ४३० मुलांची दृष्टिदोष तपासणी झाली असून, यात एकूण ६ हजार ५४७ मुलांना दृष्टिदोष असल्याचे निदर्शनास आलेले आहे. दृष्टिदोष असलेल्या विद्यार्थ्यांना शासनाच्या आरोग्य विभागाकडून चष्मे वाटप केले जात आहेत.
वर्षभरात शासनाकडून ३ हजार ९२१ मुलांचे चष्मे प्राप्त झालेले असून, त्याचे वाटप झालेले आहे. उर्वरित मुलांचे चष्मे लवकरच प्राप्त होताच वाटप केले जाणार आहे. तसेच, मोहिमेदरम्यान ७५ मुलांच्या डोळ्यांच्या विविध शस्त्रक्रिया मोहिमेदरम्यान पार पाडण्यात आल्या आहेत.
या विषयी अधिक माहिती देताना जिल्हा अंधत्व निवारण समितीचे नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. गणेश इंदूरकर म्हणाले, कोरोनात ऑनलाइन शिक्षण व मुलं जास्त वेळ मोबाईल, टीव्ही पाहत असल्यामुळे त्याचा परिणाम डोळ्यावर झाला आहे. चष्मे लागण्याचे कारणही आनुवंशिक असू शकते. कारण, शंभर मुलांची तपासणी केली असता सात ते आठ जणांना चष्मे लागतात. जिल्हा अंधत्व निवारण समिती व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ही तपासणी मोहीम सुरू राहणार आहे.
आपले ‘द लेमन न्यूज’ न्यूज पोर्टल The lemon news नावाने ‘फेसबुक’, ‘टेलिग्राम’, ‘डेलिहंट’, ‘कू’ , ‘यूट्युब’वर आणि ‘ट्विटर’ वरही उपलब्ध (बातमीसाठी मोबाईल – 9404007610 व्हाटसअपवर संपर्क करा)
Visit us : https://thelemonnews.com
‘द लेमन न्यूज’च्या व्हाट्सॲप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी या दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/JdW1bsyn7wpBvxpavr.OnMA
¤ बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर इंग्रजीच्या पेपरमध्ये पास होणे झाले सोपे
मुंबई : इंग्रजी विषयाची धास्ती अनेक विद्यार्थ्यांना असते. पास होणार की नाही अशी धाकधूक शेवटपर्यंत असते. मात्र यंदा इंग्रजीत पास होणे विद्यार्थ्यांसाठी थोडे सोपे झाले आहे. त्याचे कारण म्हणजे बारावीच्या परीक्षा मंडळाने पेपरमध्ये एक चूक केल्याने इंग्रजीचा पेपर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट 6 गुण दिले जाणार आहेत. त्यामुळे इंग्रजीचे टेन्शन कमी झाल्याची भावना काही विद्यार्थी आणि पालकांनी व्यक्त केली आहे.
बारावीच्या पहिल्याच इंग्रजीच्या पेपरमध्ये प्रश्नांऐवजी पर्यवेक्षकांना दिलेल्या पेपर तपासण्याच्या सूचना छापण्यात आल्या होत्या. अखेर बोर्डाला चूक लक्षात आली असून, सर्वच विद्यार्थ्यांना त्या प्रश्नांचे सरसकट सहा गुण देण्याची भूमिका पुणे बोर्डाने घेतली आहे. इंग्रजीचे विषयतज्ज्ञ व सर्व विभागीय मंडळाचे प्रमुख नियामक यांच्यासमवेत संयुक्त सभा झाल्यावर सरसकट गुण देण्याचा अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे.