Thursday, March 23, 2023
The Lemon News
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • बॉलिवूड
  • ब्लॉग
  • शेती
  • लाईफस्टाईल
  • धार्मिक
  • खेळ
No Result
View All Result
The Lemon News
No Result
View All Result

Kasba by-election विजयानंतर रवींद्र धंगेकर केसरीवाड्यात; पुण्यातल्या पेठांनी भाजपला नाकारले

Rabindra Dhangekar in Kesariwada after victory; Peths in Pune rejected Kasba Peth by-election to BJP

The Lemon News by The Lemon News
March 2, 2023
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकारण
0
Kasba by-election विजयानंतर रवींद्र धंगेकर केसरीवाड्यात; पुण्यातल्या पेठांनी भाजपला नाकारले
0
SHARES
200
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे : पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीत भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्याने टिळक कुटुंबात नाराजीचे वातावरण होते. दरम्यान आज झालेल्या मतमोजणीत महाविकास आघाडीचे नेते रवींद्र धंगेकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. Rabindra Dhangekar in Kesariwada after victory; Peths in Pune rejected Kasba Peth by-election to BJP विजय मिळाल्यानंतर रवींद्र धंगेकर केसरीवाड्यात गेले. तेथे धंगेकर यांनी केसरी वाड्याच्या गणपतीचे दर्शन घेतले आहे. यावेळी त्यांनी शैलेश टिळक आणि कुणाल टिळक यांची देखील भेट घेतली.

 

संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या कसब्याच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांना पराभवाची धूळ चारली आहे. तर इकडे पिंपरी चिंचवड मतदारसंघातून भाजपच्या आश्विनी जगताप विजयी घौडदौड सुरु ठेवली आहे. त्यांच मताधिक्य १० हजारापेक्षा अधिक असून अंतीम निकाल अद्याप जाहीर नाही.

 

पुण्यातल्या पेठा भाजपचा बालेकिल्ला समजल्या जातात. मात्र या कसब्यात ब्राम्हण उमेदवार आणि टिळक घराला नाकारण्याचा फटका भाजपला बसतांना दिसत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना कसबा पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, नवी पेठ काही भाग, अल्पना टॉकीज, बुधवार पेठ, रविवार पेठ, गणेश पेठ, डोके तालीम, बोहरी आळी, रामेश्वर चौक, शुक्रवार पेठ, टिळक रस्ता या ठिकाणाहून धंगेकर यांना आघाडी मिळाली आहे.

 

कसबा पेठ येथील निकाल जाहीर झाला आहे. या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर विजयी झाले आहेत. तर भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव झाला आहे. रासने यांनी आपला पराभव मान्य केला आहे. मतमोजणीच्या सर्व 20 फेऱ्या संपल्या आहेत. धंगेकर यांना 72599 आणि रासने यांना 61771 मते मिळाली आहेत.

 

 

आपले  ‘द लेमन न्यूज’ न्यूज पोर्टल  The lemon news नावाने ‘फेसबुक’,  ‘टेलिग्राम’,  ‘डेलिहंट’, ‘कू’ , ‘यूट्युब’वर आणि ‘ट्विटर’  वरही उपलब्ध (बातमीसाठी मोबाईल – 9404007610 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

Visit us : https://thelemonnews.com

‘द लेमन न्यूज’च्या व्हाट्सॲप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी या दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/JdW1bsyn7wpBvxpavr.OnMA

 

 

पहिल्या दिवसापासूनच वादात सापडलेल्या आणि चर्चेत असलेल्या कसबा पोटनिवडणुकीचा निकाल अखेर हाती आला आहे.कसब्यात काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भाजपच्या पारंपारिक मतदारसंघात काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी विजयी मुसंडी मारत भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव केला आहे.

 

कसबा पेठ येथे मतमोजणीच्या 15 व्या फेरीनंतर काँग्रेसचे रविंद्र धंगेकर यांनी तब्बल 6 हजार मतांनी आघाडी घेतली आहे. त्यांना आतापर्यंत 56497 मते मिळाली आहेत. तर भाजपचे हेमंत रासने यांनी 50490 मते घेतली आहेत. आता मतमोजणीच्या फक्त 5 फेऱ्या शिल्लक आहेत. त्यामुळे आपलाच विजय होणार, असे स्पष्ट करत रविंद्र धंगेकर यांनी कार्यकर्त्यांसोबत विजयी जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली आहे.

कसबा पेठ येथील विधानसभा पोटनिवडणुकीत रविंद्र धंगेकर यांनी तब्बल 5285 मतांनी आघाडी घेतली आहे. या ठिकाणी मतमोजणीच्या 14 फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. धंगेकर यांनी आतापर्यंत 52831 मते घेतली आहेत. तर हेमंत रासने यांना 47546 मते मिळाली आहेत. त्यामुळे धंगेकर यांनी आपला विजय निश्चित असल्याचे स्पष्ट केले आहे. आता मतमोजणीच्या फक्त 6 फेऱ्या शिल्लक आहेत. हा विधानसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला होता.

कसब्यात मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकरांनी आपली आघाडी कायम ठेवली होती. महत्त्वाची बाब म्हणजे, सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठ या पेठांमधील मतमोजणी पूर्ण झाल्यावर देखील कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर आघाडीवर होते. हे अनपेक्षित आणि कसब्याच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच घडलं असेल. सदाशिव पेठ, नारायण पेठ, आणि शनिवार पेठेत भाजपच्या हेमंत रासनेंना आघाडी मिळाली खरी, मात्र ती रवींद्र धंगेकरांना पिछाडीवर टाकण्यास फारशी उपयोगी पडली नाही. रासनेंना मिळालेली आघाडी धंगेकरांना मिळालेल्या कसबा पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ इथल्या आघाडीवर मात करु शकली नाही. अखेर भाजपचा पारंपारिक मतदारसंघ काँग्रेसने हिसकावून घेतल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा हा मोठा विजय असल्याचं बोललं जात आहे.

 

कसब्यात भाजपाचा विजय हा नेहमी शिवसेनेच्या पाठिंब्यानेच होत आला. आज शिवसेना मविआचा घटक आहे. आम्ही सगळे एकत्र आहोत. त्याचा परिणाम तिथे दिसतोय. चिंचवडमध्ये तर भाजपाला शेवटपर्यंत घाम फुटल्याशिवाय राहणार नाही. तिथे तिरंगी लढत आहे. आम्ही अपेक्षा ठेवून आहोत, असे विधान खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

 

● ‘उमेदवार म्हणून मी कमी पडलो’

उमेदवार म्हणून मी कमी पडलो, त्यामुळे माझा पराभव होताना दिसत आहे, हा पराभव मी विनम्रपणे स्वीकार करतो, असे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी म्हटले आहे. कसबा येथे काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना निर्णायक अशी 10 हजारांपेक्षा जास्त आघाडी मिळाली आहे. येथे 17 फेऱ्या संपल्या आहेत. अजून मतमोजणीच्या 3 फेऱ्या शिल्लक आहेत. धंगेकर यांना आतापर्यंत 67953 आणि हेमंत रासने यांना 58905 मते मिळाली आहेत.

 

 

》 कलाटे व काटे यांच्या मतांची बेरीज म्हणजे भाजपचा पराभव

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप विजयी होणार, असे सध्या चित्र आहे. त्या 10 हजार मतांनी आघाडीवर आहेत. मात्र येथील बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांना जास्त मते मिळाली आहेत. तसेच राष्ट्रवादीचे नाना काटे यांनाही अधिक मते मिळाली आहेत. या दोन्ही मतांची एकत्र बेरीज केली तर भाजपविरोधात मतदान झाले आहे, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आहे. कसब्यातील विजयावरही त्यांनी आनंद व्यक्त केला.

 

 

》 पत्रकार परिषदेत उध्दव ठाकरे म्हणाले…

– मतदार वेगळा विचार करू शकतात हे निवडणूकीत दिसले.

– चिंचवडमध्ये भाजपाविरोधी मतदारांची संख्या वाढते.

– वापरा आणि फेका ही भाजपची निती.

– निवडणुकीसाठी भाजपने फक्त प्रादेशिक पक्षांचा वापर करून घेतला.

– त्या विधानावर संजय राऊतांशी बोलून माझी भुमिका स्पष्ट करेन

– आंबेडकरांच्या युतीबाबत शरद पवारांशी चर्चा सुरू.

– निवडणूक आयोगाबाबत सुप्रीम कोर्टाचा निर्णय स्वागतार्ह.

 

 

》 सत्ता संघर्षाची सुनावणी 14 मार्चला

 

 

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावरील सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी संपली आहे. आता पुढील सुनावणी ही 14 मार्चला होणार आहे. त्यामुळे या प्रकरणावर काय निकाल येणार याची अजूनही वाट पाहावी लागणार आहे. हे प्रकरण आज निकाली निघेल अशी शक्यता वर्तवली जात होती. कारण कोर्टाने लागोपाठ सुनावणी घेऊन आज अंतिम सुनावणी असेल हे आधीच जाहीर केले होते. पण ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली.

 

 

 

 

Tags: #RavindraDhangekar #Kesariwada #victory #Peths #Pune #rejected #KasbaPeth #by-election #BJP#कसबापेठ #पोटनिवडणूक #विजय #रवींद्रधंगेकर #केसरीवाडा #पुणे #पेठ #भाजप #नाकारले
Previous Post

विदाऊट कन्सेंट काढलेल्या व्हिडिओजमुळे कित्येकांची आयुष्ये बरबाद झालीत ….अतिशय वायझेडपणाचं लक्षण

Next Post

Credit card scam क्रेडिट कार्ड घोटाळा : माधुरी दीक्षित, अभिषेक, अलिया, धोनीचे ओळखपत्र वापरुन लाखोंची फसवणूक; अनेक कलाकार अडचणीत

The Lemon News

The Lemon News

Next Post
Credit card scam क्रेडिट कार्ड घोटाळा : माधुरी दीक्षित, अभिषेक, अलिया, धोनीचे ओळखपत्र वापरुन लाखोंची फसवणूक; अनेक कलाकार अडचणीत

Credit card scam क्रेडिट कार्ड घोटाळा : माधुरी दीक्षित, अभिषेक, अलिया, धोनीचे ओळखपत्र वापरुन लाखोंची फसवणूक; अनेक कलाकार अडचणीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटर पेज

फेसबुक पेज

Currently Playing
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Lemon News All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • बॉलिवूड
  • ब्लॉग
  • शेती
  • लाईफस्टाईल
  • धार्मिक
  • खेळ

© 2021 Lemon News All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697