मुंबई/ पुणे : सायबर गुन्ह्यांत वाढ होत आहे. त्यातच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका टोळीने अनेक बॉलिवूड अभिनेते आणि क्रिकेटपटूंच्या जीएसटी क्रमांकावरुन पॅन कार्डचा डेटा चोरला आणि पुण्यातील फिनटेक स्टार्टअप ‘वन कार्ड’ कडून त्यांच्या नावाने जारी केलेली क्रेडिट कार्ड मिळवली अन् त्यावरुन खरेदी करत लाखो रुपयांची फसवणूक केली. Credit card scam: Madhuri Dixit, Abhishek, Alia, Dhoni defrauded using identity cards of lakhs; Many artists are in trouble यात माधुरी दीक्षित, धोनी यांसारख्या अनेक कलाकारांची नावे आहेत.
बॉलिवूड आणि क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या नावाने क्रेडिट कार्ड बनवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. क्रेडिट कार्ड घोटाळा समोर आला आहे. सेलिब्रिटीजच्या जीएसटी नंबरच्या सहाय्याने त्यांचे पॅन कार्ड डिटेल्स काढून त्यांच्या नावाने क्रेडिट कार्ड फ्रॉड केल्याचं प्रकरण नुकतंच उघडकीस आलं आहे. या सेलिब्रिटीजच्या नावावर फिनटेक कंपनी ‘वन कार्ड’ या कंपनीची क्रेडिट कार्ड मागवण्यात आली होती. यात माधुरी दीक्षित, अभिषेक बच्चन, अलिया भट्ट, सचिन तेंडुलकर, धोनीसारख्या दिग्गजांचा समावेश आहे.
बॉलिवूडमध्ये खळबळ उडवून देणाऱ्या या प्रकाराची तक्रार पुण्यातून आली. पुण्यातील मेसर्स एफपीएल टेक्नोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे प्रतिनिधी शेखावत यांनी सायबर सेलकडे या प्रकरणाची तक्रार केली होती. एक कंपनी व्हर्चुअल कार्ड आणि क्रेडिट कार्ड तयार करते. सेलिब्रेटिजचे बनावट पॅन कार्ड आणि आधार कार्ड तयार करून त्याद्वारे क्रेडिट कार्ड तयार केले जातात. या कंपनीला या गँगने २१.३१ लाख रुपयांचा चुना लावण्याचा आरोप कंपनी व्यवस्थापनाने केला आहे.
सेलिब्रिटीजच्या नावावर फीनटेक कंपनी ‘वन कार्ड’ या कंपनीची क्रेडिट कार्ड मागवण्यात आली होती. कंपनीला याबद्दल माहिती मिळाली तोपर्यंत या वेगवेगळ्या कार्डच्या माध्यमातून २१.३२ लाखांची खरेदी करण्यात या लोकांना यश मिळालं. ही माहिती समोर येताच कंपनीने ताबडतोब दिल्ली पोलिसात तक्रार केली आणि चौकशी केल्यानंतर पोलीसांना ५ लोकांना अटक करण्यात यश मिळालं आहे.
आपले ‘द लेमन न्यूज’ न्यूज पोर्टल The lemon news नावाने ‘फेसबुक’, ‘टेलिग्राम’, ‘डेलिहंट’, ‘कू’ , ‘यूट्युब’वर आणि ‘ट्विटर’ वरही उपलब्ध (बातमीसाठी मोबाईल – 9404007610 व्हाटसअपवर संपर्क करा)
Visit us : https://thelemonnews.com
‘द लेमन न्यूज’च्या व्हाट्सॲप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी या दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/JdW1bsyn7wpBvxpavr.OnMA
क्रेडिट कार्ड कंपनीने पोलीसांना दिलेल्या माहितीत सांगितलं की ही एक पुणे स्थित फीनटेक कंपनी आहे जी ‘वन कार्ड’ नावाने क्रेडिट कार्ड पुरवते, खरंतर हे एक मेटल कार्ड आहे. या आरोपींना या घोटाळ्यातून तब्बल १० लाखांचं क्रेडिट लिमिटसुद्धा मिळालं होतं. हा एकूणच प्रकार आता उघडकीस आल्याने चांगलीच खळबळ माजलेली आहे.
पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. पकडलेल्या आरोपींपैकी एक जण बीटेक आहे. त्यांच्याकडे २५ पेक्षा जास्त बनावट आधारकार्ड, ४० क्रेटिड कार्ट, १० मोबाइल, १ लॅपटॉप, ४२ सिमकार्ड, ३४ बनावट कार्डसहित पाच चेकबुक जप्त करण्यात आले आहेत. मागील २ वर्षांमध्ये या गँगने आतापर्यंत ९० लाख रुपयांची फसवणुक केल्याची कबूली आरोपींनी दिली आहे.
सायबर सेलने या टोळीचा पर्दाफाश केला आहे. फिल्मी स्टार्सच्या नावाने बनावट क्रेटिड कार्ड तयार करून या टोळक्याने बँकांना लाखो रुपयांचा चुना लावण्याचं उघडकीस आलंय. यात आलिया भट्ट, दीपिका पदुकोण, ऐश्वर्या राय, शिल्पा शेट्टी आणि सोनम कपूर यांच्यासह एकूण ९८ सेलिब्रेटिजची नावं समाविष्ट आहेत. या गँगने आतापर्यंत ९० लाखांहून अधिक फ्रॉड केल्याची माहिती पोलिसांना तपासाअंती मिळाली आहे.
या फसवणुकीसाठी टोळक्याने अभिनेत्री आलिया भट्ट, दीपिका पादुकोण,ऐश्वर्या राय बच्चन, एम एस धोनी, अभिषेक बच्चन, सोनव कपूर, सचिन तेंडुलकर, सैफ अली खान, हृतिक रोशन, शिल्पा शेट्टी आणि इतर अनेक व्यक्तींच्या नावाचा आणि वलयाचा वापर करून घेतला आहे. या हायप्रोफाइल सेलिब्रिटींच्या नावाखाली सायबर फ्रॉड सुरु होता.
या सेलिब्रेटीजच्या नावावर आधी गैर मार्गाने सरकारी ओळखपत्र जसे की, आधारकार्ड, पॅनकार्ड आणि इतर दस्तावेज तयार केले जात होते. त्यानंतर हेच दस्तावेज फसवणुकीसासठी वापरले जात होते. सेलिब्रेटींच्या नावाने विविध बँकांकडून कर्ज घेण्याचे प्रकार मागील दोन वर्षांपासून सुरु होते. क्रेडिट कार्ड बनवून बँकांना हे लोक फसवत होते.