भोपाळ : सोशल मीडियावर मध्य प्रदेशातील एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यावरुन काँग्रेस – भाजपामध्ये चांगलाच वाद रंगल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपतर्फे इंडियन बॉडी बिल्डिंग फेडरेशनच्या अंतर्गत दोन दिवसीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. Body builder in bikini in front of photo of Lord Hanuman Ratlam Indian Body Building Federation Madhya Pradesh अनेक महिला यात सहभागी झाल्या होत्या. यावेळी हनुमानाच्या फोटोसमोर संगिताच्या तालावर महिलांनी बिकिनीत पोझ दिल्याने काँग्रेसने भाजप अश्लिलता पसरवत असल्याचा आरोप केला आहे.
मध्य प्रदेशच्या रतलाममध्ये भाजप नेत्याकडून ज्यूनियर बॉडी बिल्डींग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत भगवान हनुमानची प्रतिमा स्टेजवर ठेवण्यात आली होती. या प्रतिमेसमोर काही मुली बिकिनीत बॉडी बिल्डींगचे पोज देत होत्या. या स्पर्धेतले काही व्हिडिओ नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या व्हायरल व्हिडिओला ट्विट करत कॉंग्रेसने भाजपावर निशाणा साधला होता. तसेच भाजप नेत्याकडून अश्लीलता पसरवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला.
हिंदूत्वाच्या मुद्यावर भाजपा नेहमीच आक्रमक पावित्रा घेत आहे. दिपिकाच्या भगव्या बिकनीवर राजकारण टोकाला पोहोचले होते. या सर्व घटना ताज्या असतानाचा आता एका भाजप नेत्याने बॉडी बिल्डींग स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत महिला बॉडी बिल्डर हनुमानाच्या प्रतिमेसमोरच बिकिनीत पोज देताना दिसल्या होत्या.
याचे फोटो, व्हिडिओ व्हायरल झाले होते. या व्हिडिओनंतर कॉंग्रेसने या घटनेवर आक्षेप घेतला आहे. तसेच भाजपावर अश्लीलता पसरवल्याचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपानंतर भाजपाने काँग्रेसवर महिलांचा अपमान केल्याचा आरोप केला. या घटनेमुळे कॉंग्रेस आणि भाजपामध्ये चांगलीच राजकारण तापले आहे.
रतलाम महापौर के मुख्य आतिथ्य में भगवान हनुमान जी की मूर्ति रखकर अश्लील प्रदर्शन वह भी मुख्यमंत्री जी के जन्मदिन के मौके पर।सनातन संस्कृति को बेचखाने वाले इस नेता पर क्या कार्यवाही होगी शिवराज जी? @BJP4India @OfficeOfKNath @digvijaya_28 @inc_jpagarwal pic.twitter.com/Xebc6dLKOW
— Bhupendra Gupta Agam (@BhupendraAgam) March 5, 2023
आपले ‘द लेमन न्यूज’ न्यूज पोर्टल The lemon news नावाने ‘फेसबुक’, ‘टेलिग्राम’, ‘डेलिहंट’, ‘कू’ , ‘यूट्युब’वर आणि ‘ट्विटर’ वरही उपलब्ध (बातमीसाठी मोबाईल – 9404007610 व्हाटसअपवर संपर्क करा)
Visit us : https://thelemonnews.com
‘द लेमन न्यूज’च्या व्हाट्सॲप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी या दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/JdW1bsyn7wpBvxpavr.OnMA
कॉंग्रेस नेता मयंक जाट आणि प्रदेश कॉंग्रेसचे महामंत्री पारस सकलेचा यांनी निवेदन जारी करून भाजपाच्या भूमिकेचा निषेध केला होता. भाजप नेत्यांनी भगवान बजरंगबलीच्या मुर्तीसमोर सनातन धर्म आणि संस्कृतीची खिल्ली उडवल्याचा आरोप केला.
तसेच पठाण सिनेमाच्या गाण्यावर गदारोळ करणारे भाजपचे महापौर आणि पक्षाचे नेते अशा कार्यक्रमाचे आयोजन करतायत? असा प्रश्न करत त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक असल्याचेही म्हटले. त्यामुळे आता स्पर्धेचे आयोजन स्थळ गंगाजलने पवित्र करत हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिला.
कॉंग्रेस नेत्याच्या या आरोपानंतर भाजपही आक्रमक झाली होती. भाजपने कॉंग्रेसवर नारी शक्तीचा अपमान केल्याचा आरोप केला.