सोलापूर – आमच्या विरोधात पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार का दिलीस असं म्हणत दोघा तरुणांनी अल्पवयीन पिडीत मुलीवर सत्तूर व कोयत्याने सपासप वार करुन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यात पिडीत मुलगी गंभीररित्या जखमी झाली आहे. ही खळबळजनक घटना बार्शी तालुक्यातील बळेवाडी गावात घडली आहे. ही घटना काल सोमवारी ( ६ मार्च ) रात्री घडली. Solapur | A minor victim was fatally attacked after reporting to the police
बळेवाडीतील दोघा तरुणांनी एका अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने घरात घुसून बळजबरी करत अत्याचार केला. या घटनेनंतर मुलीच्या घरच्यांनी याबाबत पोलीसात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पुन्हा या तरुणांनी पिडीत मुलीच्या घरी जावून तु आमच्या विरोधात पोलीसात बलात्काराची तक्रार का दिलीस आता तुला जिवंतच सोडत नाही असं म्हणत तिच्यावर सत्तूर व कोयत्याने सपासप वार करुन तिचा जीव मारण्याचा प्रयत्न केला. यात पिडीत मुलगी गंभीररित्या जखमी झाली असून सदर मुलीवर सोलापूरातील रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहेत.
ही घटना सोमवारी ( ६ मार्च ) रात्री घडली. याबाबत पिडीत मुलीच्या वडीलांनी पोलीसात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी अक्षय विनायक माने (वय २३) व नामदेव सिध्देश्वर दळवी (वय २४) दोघे रा. बळेवाडी यांच्या विरोधात पोलीसात गुन्हा नोंदवला आहे.
या दोघा आरोपींनी ५ मार्च रोजी रात्री पिडीत मुलीवर अत्याचार केला होता, त्यानंतर त्यांच्या विरोधात पोलीसात पोक्सो कायद्यान्वये बलात्काराचा गुन्हा नोंदवला होता. गुन्हा नोंद झाल्याची माहिती कळताच आरोपी दुसऱ्यादिवशी रात्री पुन्हा पिडीत मुलीच्या घरी जावून हा जीवघेणा हल्ला केलायं. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक परजने करत आहेत.
आपले ‘द लेमन न्यूज’ न्यूज पोर्टल The lemon news नावाने ‘फेसबुक’, ‘टेलिग्राम’, ‘डेलिहंट’, ‘कू’ , ‘यूट्युब’वर आणि ‘ट्विटर’ वरही उपलब्ध (बातमीसाठी मोबाईल – 9404007610 व्हाटसअपवर संपर्क करा)
Visit us : https://thelemonnews.com
‘द लेमन न्यूज’च्या व्हाट्सॲप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी या दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/JdW1bsyn7wpBvxpavr.OnMA
● कॉम्प्युटर टायपिंगची परिक्षा न देताही प्रमाणपत्र ; सोलापुरात फसवणुकीचा गुन्हा दाखल
सोलापूर – कॉम्प्युटर टायपिंगची परिक्षा न देताही अविस कॉम्प्युटर्स संस्थेनं प्रमाणपत्र देवून फसवणूक केली अशी फिर्याद फौजदार चक्रधर ताकभाते (रा. जोडभावी) यांनी विजापूर नाका पोलीसात दिली आहे.
या प्रकरणी आय.टी.आय. पोलीस चौकी शेजारी असलेल्या अविस कॉम्प्युटर्सचे मालक अविनाथ उत्तरेश्वर मठपती, व्यवस्थापक श्रावणी पाटील यांच्या विरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संस्थेत आपण मराठी प्रमाणपत्राची मागणी केली असता तेथील प्रशासक म्हणून काम करणाऱ्या श्रावणी पाटील यांनी आपल्याकडून पैसे भरल्याची खात्री करुन आपल्या नावाचे महाराष्ट्र ज्ञान महामंडळ पुणेचे कॉम्प्युटर, टायपिंग स्पिड टेस्टचे सही, शिक्का असलेले प्रमाणपत्र आपल्याला दिले.
प्रत्यक्षात आपण या संस्थेत कोणतेही प्रशिक्षण घेतले नाही, परिक्षाही दिली नाही. तरी देखील उभयतांनी आपल्या ऐवजी दुसऱ्या कोणालातरी परिक्षेस बसवून प्रमाणपत्र घेवून आपल्याला दिले. आर्थिक फायद्याकरिता ज्ञान महामंडळाची फसवणूक केली असे ताकभाकते यांनी फिर्यादीत म्हंटलयं. पुढील तपास विजापूर नाक्याचे स. पो. नि. देशमुख करीत आहेत.