सोलापूर : महापालिकेच्या टॅक्स विभागाचे कर्मचारी असल्याची बतावणी करून वृद्ध दाम्पत्याच्या घरातील उघड्या कपाटातील साडेबारा तोळे सोने दोघा चोरट्यांनी दिवसाढवळ्या चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (ता. 10) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. Solapur. Gaddarshan Damaninagar 12 and a half tola gold in broad daylight by pretending to be municipal employee
ही घटना दमाणीनगरातील गडदर्शन सोसायटीमध्ये घडली. चोरी सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या घरी झाली. शुक्रवारी सकाळी एका काळ्या रंगाच्या दुचाकीवर दोन अज्ञात इसम गडदर्शन सोसायटीमध्ये आले. त्यांनी अलीकडील एका घरातील महिलेला धोंडिबा सुरवसे कुठे राहतात असे विचारले. त्यांनी समोर राहतात असे सांगितल्यानंतर ते दिनेश उर्फ धोंडिबा सुरवसे यांच्या घराकडे गेले. त्यांनी आपली दुचाकी घराच्याबाहेर लावली आणि आत प्रवेश केला.
घरामध्ये सेवानिवृत्त प्राध्यापक सुरवसे आणि त्यांच्या पत्नी होत्या. दोघेही प्रकृती ठीक नसल्याने जागेवर बसून असतात. तर मुलगा कामाला गेला होता आणि सुनबाई माहेरी गेली होती. या दोघांनी त्यांना आपण महापालिकेच्या टॅक्स विभागाचे कर्मचारी असून घराचे मेजरमेंट घ्यावयाचे असल्याचे सांगून त्यांना बोलण्यात गुंतविले. एकाने त्यांना पावत्यांची फाईल घेऊन घराच्या बाहेर बोलावले तर दुसऱ्याने थेट आतल्या घरातील उघड्या कपाटातून सोने ठेवलेली पर्स घेतली आणि त्यानंतर काम फत्ते करून ते दोघेही घराच्या बाहेर पडले.
त्यानंतर संशय आलेल्या सुरवसे यांनी आतल्या खोलीत जाऊन कपाट पाहिले असता त्यातील सोन्याची पर्स त्यांना दिसली नाही. त्यांनी तत्काळ आपल्या मुलाला फोन केला आणि बोलावून घेतले. तोपर्यंत आजूबाजूच्या लोकांनाही याची माहिती झाली होती. त्यानंतर सुरवसे आणि त्यांचा मुलगा अभिजित हे दोघेजण फौजदार चावडी पोलिसात गेले आणि तेथे त्यांनी झालेली घटना सांगितली.
त्यानंतर तत्काळ फौजदार चावडीचे पोलीस अधिकारी उदयसिंह पाटील, फौजदार सतीश भोईटे तसेच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील- दोरगे व अन्य पोलीस पथक तेथे आले. त्यांनी घराची सर्व पाहणी केली. आजूबाजूच्या लोकांशी- चर्चा केली. ज्या महिलेने त्या दोघांना पाहिले होते. त्यांनाही त्यांनी बोलावून चोरटे नेमके कसे दिसत होते? आणि कोणत्या वेशात होते आणि कोणती भाषा बोलत होते? याची माहिती घेतली. सोसायटीसह दमाणीनगर भागातील काही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. त्यावरुन पोलिसांचा तपास सुरु आहे.
आपले ‘द लेमन न्यूज’ न्यूज पोर्टल The lemon news नावाने ‘फेसबुक’, ‘टेलिग्राम’, ‘डेलिहंट’, ‘कू’ , ‘यूट्युब’वर आणि ‘ट्विटर’ वरही उपलब्ध (बातमीसाठी मोबाईल – 9404007610 व्हाटसअपवर संपर्क करा)
Visit us : https://thelemonnews.com
‘द लेमन न्यूज’च्या व्हाट्सॲप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी या दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/JdW1bsyn7wpBvxpavr.OnMA
》 पंढरपुरातील बोगस डॉक्टरला दोन वर्षे कारावासाची शिक्षा
पंढरपूर : कोणतेही वैद्यकीय पदवी नसताना आपण डॉक्टर आहे असे भासवून चुकीच्या पद्धतीने उपचार करून रुग्णांना फसवणाऱ्या बंगाली डॉक्टरला पंढरपूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती बनसोड यांनी दोन वर्षे सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
पंढरपूर तालुक्यातील तुंगत या गावात विबास उर्फ विभास विरेन रॉय हा वैद्यकीय महाविद्यालयाची पदवी नसताना तसेच वैद्यकीय व्यवसायाचे कायदेशीर ज्ञान नसताना आणि इंडियन मेडिकल कौन्सिल नोंदणी नसताना आपण डॉक्टर आहे असे भासवून रुग्णाकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक करून त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने उपचार करून बेकायदेशीर रित्या वैद्यकीय व्यावसाय करून जनतेच्या आरोग्यास व जीवितास धोका निर्माण करीत असताना पोलिसांना सापडला होता. त्याच्यावर 419, 420 तसेच इंडियन मेडिकल कौन्सिल आणि इतर कायद्यान्वये पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
उपविभागी पोलीस अधिकारी विक्रम कदम आणि पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास हा सहाय्यक फौजदार अशोक जाधव यांनी करून न्यायालयात बोगस डॉक्टर विरोधात दोषारोप पत्र दाखल केले होते.
या प्रकरणांमध्ये एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले आहेत आणि सहकारी वकील के एस देशमुख यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने बोगस डॉक्टर विबास उर्फ विभास विरेन रॉय रा. पश्चिम बंगाल याला विविध कलमांतर्गत दोन वर्षाची शिक्षा आणि दंड ठोठावला आहे.