मुंबई : विद्या बालनने कास्टिंग काऊचबाबत एक खुलासा केला आहे. एक चित्रपट साइन केल्यावर दिग्दर्शकाने मला कॉफी शॉपमध्ये भेटायला बोलवले. त्यावेळी त्याने मला रूममध्ये नेण्यासाठी जबरदस्ती केली, असे तिने म्हटले. ‘He forced me into the room; Vidya Balan’s Experience on Casting Couch Interviews Bollywood पण रूममध्ये गेल्यावर मी युक्ती वापरून दरवाजा उघडाच ठेवला. त्यामुळे त्या दिग्दर्शकाने कोणतेच वाईट कृत्य केले नाही. तसेच त्याने मला कोणताही इशारा केला नाही, पण मला असुरक्षित वाटत होते, असे विद्या म्हणाली.
कित्येक अभिनेत्रीना यशाच्या शिखरावर चढत असताना समोर येतो कास्टिंग काऊचसारखा प्रसंगास सामोरे जावे लागले. आजपर्यंत अनेक कलाकारांनी कास्टिंग काऊचचा सामना केला आहे. पूर्वी अभिनेत्री कास्टिंग काऊचवर उघडपणे बोलत नव्हत्या, पण आता कास्टिंग काऊचचा आलेला धक्कादायक अनुभव अभिनेत्री चाहत्यांसोबत शेअर करतात आणि घडलेली घटना उघडपणे सांगतात. अभिनेत्री विद्या बालन हिने देखील कास्टिंग काऊच सारख्या प्रसंगाचा सामना केला आहे.
विद्याने त्या दिग्दर्शकाचं नाव न सांगता हा धक्कादायक प्रकार सगळ्यांसमोर सांगितला. परिणामी तिच्या हातून तो चित्रपटही गेल्याचेही म्हटलंय. दिग्दर्शकाने कोणतेही संकेत दिले नाहीत, परंतु मला समजले की मी असुरक्षित आहे. मला त्या खोलीचे वातावरण आवडले नाही. कास्टिंग काऊचच्या अनुभवाबद्दल सांगताना अभिनेत्री विद्या बालन म्हणाली, ‘मी स्वतःला नशीबवान समजते, की मला कास्टिंग काऊचसारख्या प्रसंगाला सामोरं जावं लागलं नाही. मी कास्टिंग काऊचबद्दल अनेक भयानक अनुभव ऐकले आहेत. याच कारणामुळे बॉलिवूडमध्ये येण्यास माझ्या आई – वडीलांचा नकार होता, असे विद्या म्हणाले.
आपले ‘द लेमन न्यूज’ न्यूज पोर्टल The lemon news नावाने ‘फेसबुक’, ‘टेलिग्राम’, ‘डेलिहंट’, ‘कू’ , ‘यूट्युब’वर आणि ‘ट्विटर’ वरही उपलब्ध (बातमीसाठी मोबाईल – 9404007610 व्हाटसअपवर संपर्क करा)
Visit us : https://thelemonnews.com
‘द लेमन न्यूज’च्या व्हाट्सॲप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी या दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/JdW1bsyn7wpBvxpavr.OnMA
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्या लक्षात आहे. मी चेन्नईमध्ये एका जाहिरातीच्या शुटिंगसाठी गेली होती. तेव्हा एका दिग्दर्शकासोबत माझी बैठक होती. दिग्दर्शकाने जाहिरातीसाठी माझी निवड केली. जेव्हा कॉफी शॉपमध्ये आम्ही भेटलो, तेव्हा त्याला मला त्याच्या खोलीत घेवून जायचं होतं. मला काही कळत नव्हतं. मी तेव्हा घाबरली होती. ‘जेव्हा त्याच्या खोलीत गेलो, तेव्हा मी दरवाजा बंद केला नाही. कारण तेथून पळ काढण्याचा तोच एक मार्ग होता. महिलांचा सिक्स सेन्स फार चांगला असतो आणि मला कळालं होतं त्याला फायदा घ्यायचा आहे. पण तेथून मी पळ काढला…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
विद्या बालन हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ती बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. यशाच्या उच्च शिखरावर चढताना विद्याला अनेक चांगल्या वाईट प्रसंगाचा सामना करावा लागला. अभिनयाच्या प्रवासात विद्याच्या अनेक सिनेमांना यश मिळाळं, तर अभिनेत्रीचे अनेक सिनेमे आपटले.
□ परीक्षेत कॉपी करताना सापडली होती श्रद्धा !
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूरने परीक्षेत कॉपी केली होती. एका मुलाखतीत श्रद्धाने याविषयी खुलासा केला आहे. एकदा एक परीक्षा देताना मी माझ्या गुडघ्यांवर उत्तरे लिहिलेली होती, तसेच ती उत्तरे पाहून मी पेपर सोडवत होती, मात्र नेमक्या त्याचवेळी आपल्याला शिक्षकांनी पकडले आणि त्यानंतर मला खूप ओरडले, असे श्रद्धाने सांगितले. कॉपी करताना पकडले गेल्याने मला नंतर नैराश्य आले होते, असेही ती म्हणाली.
● राधिका साकारणार स्पाय एजंटची भूमिका
अभिनेत्री राधिका आपटे ही आपल्या बोल्डनेसमुळे सतत चर्चेत असते. आता राधिका ही लवकरच मिसेस अंडरकव्हर या आपल्या नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात ती दुर्गा नामक एका स्पाय एजंटची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात तिच्या सोबत सुमित व्यास आणि राजेश शर्मा हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले असून राधिकाच्या लूकने अनेकांचे लक्ष वेधले आहे.