● पत्नीनेच दिली पती हरवल्याची पोलिसात तक्रार
सोलापूर : तृतीयपंथीयाशी अनैतिक संबंध त्यात पतीचा अडसर मग काय पत्नीने अडसर ठरणा-या पतीचा तृतीयपंथीयाच्या मदतीने खून केला. उलट पती हरवल्याची तक्रारही त्याच खून करणा-या पत्नीने पोलिसात दिली. वाचा सोलापुरात घडलेली घटना. Unethical relationships with third parties; Wife killed husband who was obstructing Sangli Solapur Pandharpur
अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या पतीचा तृतीयपंथीय मित्राच्या मदतीने खून करून रेल्वे मार्गावर टाकून दिल्याप्रकरणी पंढरपूर शहर पोलिसांनी आरोपी पत्नी व तिच्या तृतीयपंथीय प्रियकराला अटक केली आहे.
मंगळवारी ( दि. ७ मार्च) रामबाग झोपडपट्टी परिसरात राहणारा वैभव हा सायंकाळच्या सुमारास अर्बन बँक चौकाकडे म्हणून गेला. त्यानंतर तो गायब झाला होता. ८ तारखेला वैभव मगर याच्या पत्नीने नवरा हरवल्याची तक्रार पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात दिली.
त्यानुसार पोलिसांनी वैभव यांच्या मोबाइलचे कॉल रेकॉर्डिंग तपासले. दरम्यान, सांगोला तालुक्यातील मांजरी गावच्या हद्दीत रेल्वे रुळावर एका व्यक्तीचा मृतदेह सापडल्याची माहिती पंढरपूर शहर पोलिस ठाण्याला मिळाली. त्यामुळे हरवलेल्या व्यक्तीचे वर्णन आणि सांगोला तालुक्यात सापडलेल्या मृतदेहाचे वर्णन मिळतेजुळते असल्यामुळे पंढरपूर पोलिसांनी या संदर्भात सांगोला पोलिसांकडे अधिक चौकशी केली.
त्यानंतर पोलिसांनी मृताच्या पत्नीला ताब्यात घेतले. त्यावेळी मृताची पत्नी व तृतीयपंथी अक्षय रमेश जाधव यांच्यामध्ये अनैतिक संबंध असल्याचे समोर आले. या अनैतिक संबंधांमध्ये वैभव मगर अडथळा ठरत असल्यामुळे त्या दोघांनी वैभव याला सांगोला रोडवरील दाते मंगल कार्यालय येथे ठार मारले व त्याचा मृतदेह खासगी वाहनातून मांजरी (ता. सांगोला) येथील रेल्वे रुळावर टाकून दिला. या खूनप्रकरणी पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. तर खासगी वाहनाचा चालक अमोल खिलारे याचा पोलिस शोध घेत आहेत.
आपले ‘द लेमन न्यूज’ न्यूज पोर्टल The lemon news नावाने ‘फेसबुक’, ‘टेलिग्राम’, ‘डेलिहंट’, ‘कू’ , ‘यूट्युब’वर आणि ‘ट्विटर’ वरही उपलब्ध (बातमीसाठी मोबाईल – 9404007610 व्हाटसअपवर संपर्क करा)
Visit us : https://thelemonnews.com
‘द लेमन न्यूज’च्या व्हाट्सॲप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी या दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/JdW1bsyn7wpBvxpavr.OnMA
》 पतीला सुटी मिळण्याकरिता पत्नीचे एसटी आगार विरोधात आंदोलन
...पण पत्नीवरच एसटीने केला गुन्हा दाखल
सांगली : सांगलीतील आटपाडी येथील एसटी आगारप्रमुखांच्या कॅबिनबाहेर झोपून आंदोलन करणाऱ्या नलिनी कदम यांच्यावर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसटी चालक पती विलास कदम यांना सुट्टी देत नसल्याने नलिनी यांनी अनोखे आंदोलन केले होते. त्यांच्या पतीने उपचारासाठी दोन दिवस सुट्टी मागितली होती ती नाकारण्यात आली होती. म्हणून नलिनी यांनी आंदोलन केले होते.
आगार प्रमुखांच्या केबिनसमोर अंथरून टाकत झोपत पत्नीने निषेध केला. न्याय हक्कासाठी करण्यात आलेल्या आंदोलनानंतर एसटी प्रशासना जाग आली. मात्र, प्रशासनाने त्या पत्नीवर प्रशासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
एसटी चालक विलास कदम यांच्या पत्नी नलिनी कदम यांनी थेट आगारप्रमुखांच्या दालनासमोर अनोख्या पद्धतीचे आंदोलन केल्यानंतर आटपाडी एसटी प्रशासनाला खडबडून जाग आली. सर्वच अधिकाऱ्यांनी आंदोलन करणाऱ्या कदम यांची भेट घेतली. धक्कादायक बाब म्हणजे पतीच्या रजेसाठी आंदोलन करणाऱ्या नलिनी कदम यांच्या विरोधात आटपाडी एसटी आगाराकडून आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सांगलीच्या आटपाडी आगारात चालक म्हणून कार्यरत असणाऱ्या विलास कदम यांना सुट्टी देण्यात आली नाही. 12 आणि 13 मार्च रोजी त्यांनी आपल्या पत्नीच्या आजाराच्या उपचारासाठी सुट्टी मागितली होती. मात्र, ती नाकारण्यात आली. त्यामुळे विलास कदम यांना ड्युटीवर जावं लागलं, पण पत्नीच्या उपचाराचा प्रश्न तसाच राहिला.
विलास कदम हे गेल्या 33 वर्षांपासून एसटीत चालक म्हणून सेवा बजावत आहेत. 70 दिवसांनी ते सेवानिवृत्त होणार आहेत. आजअखेर त्यांची 270 दिवस रजा शिल्लक आहे. आजारी पत्नीला बाहेरगावी रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी 12 मार्च आणि 13 मार्च अशा दोन दिवसाच्या रजेसाठी त्यांनी आगार प्रमुखांकडे 6 मार्च रोजी अर्ज केला होता. मात्र एसटी प्रशासनाने त्यांना सुट्टी नाकारत त्यादिवशी आटपाडी-इचलकरंजी ही ड्युटी असल्याचे कारण दिले.
रविवारी (12 मार्च) सकाळी चालक कदम आणि त्यांची पत्नी नलिनी कदम आटपाडी आगारामध्ये आले होते. यावेळी सुरक्षारक्षकाने चालक कदम यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी ही माझी पत्नी असल्याचे सांगितले. यावेळी नलिनी कदम या एका झाडाखाली बसल्या होत्या. दरम्यान चालक कदम हे त्यांना दिलेली आटपाडी इचलकरंजी गाडी घेऊन सेवेवर गेले. सुरक्षारक्षक गेटवर कामात व्यस्त असताना नलिनी यांनी आगार प्रमुखांची केबिन गाठत बंद केबिनसमोर अंथरुण पांघरुण टाकत आंदोलन सुरु केले.