□ पत्नीला मसाज करण्याच्या बहाण्याने घरी बोलावले, नियत फिरली
सोलापूर : आपल्या आजारी पत्नीला मसाज करण्याच्या बहाण्याने महिला सफाई कर्मचाऱ्याला घरी बोलावून महापालिकेतील आरोग्य निरीक्षकाने तिचा विनयभंग केल्याची घटना घडली. By the Health Inspector at Solapur Female cleaning worker molested wife massage intention
याबाबत पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून नागेश धरणे या आरोग्य निरीक्षकाविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. महिला कर्मचारी यापूर्वी पंचकर्म केंद्रात काम करीत होत्या. त्यामुळे त्यांना आजारी रुग्णास मालिश करण्याची पद्धत माहिती आहे.
शनिवारी (ता. 11) पीडितेच्या पतीच्या फोनवर संपर्क करून आरोग्य निरीक्षक धरणे यांनी पीडितेला पत्नीच्या मालिशकरिता घरी पाठविण्यास सांगितले. याबाबत पतीकडून निरोप आल्याने पीडिता आरोग्य निरीक्षकाच्या घरी गेल्या. त्यावेळी घरात आरोग्य निरीक्षक व त्यांच्या आई होत्या. पीडितेने आरोग्य निरीक्षकांना मॅडम कोठे आहेत असे विचारले. त्यावर आरोग्य निरीक्षकाने त्यांच्या आईला घराच्या वरच्या. खोलीत जाण्यास सांगून बसण्यास पीडितेला सोफ्यावर सांगितले. त्यानंतर आरोग्य निरीक्षकाने पीडितेचा विनयभंग केला.
पीडिता ही मसाजचे काम करते. विशेष म्हणजे पीडित महिला त्याच कार्यालयात सफाई कामगार म्हणून कार्यरत आहे. मसाज आणि नोकरी करून उपजीविका चालवत असल्याची माहिती पीडित महिलेने पोलिसांना दिली आहे. ही माहिती पीडितेने आपल्या घरी येऊन पतीला सांगितली. त्यानंतर याप्रकरणी पीडितेने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून आरोपी नागेश धरणे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा अधिक तपास जेऊघाले करत आहेत.
आपले ‘द लेमन न्यूज’ न्यूज पोर्टल The lemon news नावाने ‘फेसबुक’, ‘टेलिग्राम’, ‘डेलिहंट’, ‘कू’ , ‘यूट्युब’वर आणि ‘ट्विटर’ वरही उपलब्ध (बातमीसाठी मोबाईल – 9404007610 व्हाटसअपवर संपर्क करा)
Visit us : https://thelemonnews.com
‘द लेमन न्यूज’च्या व्हाट्सॲप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी या दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/JdW1bsyn7wpBvxpavr.OnMA
》 चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून अभिनेत्रीवर केला बलात्कार
सोलापुरातील ग्रामीण भागातील अभिनेत्रीने दाखल केली फिर्याद
सोलापूर : चित्रपटात चांगली भूमिका देतो असे म्हणून २५ वर्षीय अभिनेत्रीला कार्यशाळेला बोलावून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार करून तिचे दीड लाख रूपये मानधन बुडवल्याचा प्रकार येडशी (ता.जि.धाराशिव) जवळील एका महाविद्यालयाच्या खोलीत घडला.
संजय उत्तमराव पाटील (वय ५०, रा. गणराज कॉलनी, सन फार्मा जवळ, बोलेगाव फाटा, नागापूर एमआयडीसी अहमदनगर) असे अभिनेत्रीवर अत्याचार केल्याप्रकरणी व तिचे मानधन बुडवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दिग्दर्शकाचे नाव आहे. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील २५ वर्षीय अभिनेत्रीने याबाबत फिर्याद दिली आहे.
सन २०१९ मध्ये पिडीत अभिनेत्री ही मुंबई येथे अभिनय करण्यासाठी गेल्यावर तिची पाटील नामक दिग्दर्शकाशी ओळख झाली होती. सन २०२२ मध्ये दिग्दर्शक संजय पाटील यांच्या ‘भाऊचा धक्का’ या चित्रपटाकरीता सेकंड लिड भूमिकेसाठी पिडीतेची निवड करण्यात आली होती. पिडीतेला अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे नियमानुसार ५ हजार रुपये प्रतिदिन मानधन देण्याचे संजय पाटील यांनी कबूल केले होते.
‘भाऊचा धक्का’ ह्या चित्रपटाचे शूटींगकरिता २० सप्टेंबर २०२२ रोजी पासून ५ दिवस येडशी (धाराशिव) येथील एक कनिष्ठ महाविद्यालयात कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत चित्रपटात काम करणारे इतर अभिनेता यांचे ऑडीशन तसेच लेखी करार इत्यादी कामे केली जाणार होती. त्यावेळेस ऑडिशनला आलेल्या मुले व मुली यांचे खाण्यापिण्याची व राहण्याची व्यवस्था ही कार्यशाळेच्या ठिकाणीच होती.
दि.२० सप्टेंबर २०२२ रोजी पिडीतेला तेथे पोहचण्यास उशिर झाला होता. रात्री ९ च्या सुमारास तेथे पोहचल्यावर पाटील यांनी अभिनेत्रीला दुसऱ्या मजल्यावरील रुम मध्ये भेटायला बोलावल्याचे सांगितले. पिडीत तिथे गेल्यावर, ‘तु सगळ्यांवर विश्वास ठेवते. माझ्यावर विश्वास ठेवत नाहीस. भाऊचा धक्का ही फिल्म केल्यावर तुला कुणाकडे काम मागण्याची गरज नाही. तुला मी चांगला रोल देणार आहे आणि पैसे पण जास्त देईन पण तु हे कुणाला सांगू नकोस असे म्हणून तिच्यावर संमतीशिवाय जबरदस्तीने अत्याचार केला.
कुणास काही सांगितले तर ‘भाऊचा धक्का’ ह्या चित्रपटात काम करायला मिळणार नाही तसेच काम जाईल ह्या भितीने फिर्यादीने कुणास काही एक सांगितले नसल्याचे पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.